Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Share
इंदिरानगर : फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार Latest News Nashik Rape on Married Woman Threaten to Send her Video Social Media

इंदिरानगर : दूध देण्याचा बहाणा करून महिलेचे व तिच्या पतीचे फोटो वायरल करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान दिलीप जाधव (वय ४० राहणार रायगड नगर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधवने कच्चे दूध देण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला. यावेळी पीडित महिलेचा मोबाईल मधील पतीचे व महिलेचे फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईल मध्ये घेऊन वायरल करण्याची धमकी दिली. यानंतर दि. ०१ जून ते ३१ डिसेंबर दरम्यान वेळोवेळी अनेक ठिकाणी अत्याचार केला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बरेला अधिक तपास करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!