Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह; ठिकठिकाणी डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

Share
Video : नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह; ठिकठिकाणी डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई, Latest News Nashik Rangpanchami Festival Dj Dance Youth Nashik

नाशिक । प्रतिनिधी- नाशिकमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात पार पडली. ठिकठिकाणी डीजे, रेन शॉवरवर तरुणाई थिरकलेली बघायला मिळाली. पोलिसांनी रहाडीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी दिली होती, त्यानुसार जवळपास सर्वच मंडळांनी रहाडीचा रंगपंचमी उत्सव पाच वाजेनंतर बंद केला होता.

जगभरात शिरकाव केलेल्या कोरोना व्हायरसमुळे यंदा नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रंगपंचमीची गर्दी कमी असली तरीदेखील अबलवृद्धांसह सर्वांनीच राहाडीत डुबकी मारण्याचा आनंद घेतला.

नाशिकची रंगपंचमी

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १३ मार्च, २०२०

ज्यांना रहाडीत जाता आले नाही त्यांनी रहाडीतून रंगाच्या बादल्या आपल्या अंगावर ओतून रंगपंचमीत ओलेचिंब होण्याचा आनंद लुटला.नाशिकमधील शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट गल्ली, तीवंधा चौक आणि दंडे हनुमान येथील रहाडीच्या सभोवताली मोठी गर्दी नाशिककरांनी केलेली दिसून आली. महिलांनीदेखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रहाड महोत्सवातील आनंद द्विगुणीत केला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!