Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमेडिकल कॉलेज, शेती सुधारणा, सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधीची तरतूद : के सी...

मेडिकल कॉलेज, शेती सुधारणा, सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधीची तरतूद : के सी पाडवी

नाशिक : नंदुरबार हा आदिवासी बहुल डोंगराळ जिल्हा असून येथील विकासासाठी भरीव निधीची तरदूद यावर्षी करण्यात आली. आहे. मागील वर्षीपेक्षा ११५ कोटीत वाढ होऊन १४५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री केसी पाडवी यांनी नाशिक येथे केले.

दरम्यान काल (दि. ३०) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाचा आढावा घेतल्यानंतर आज केसी पाडवी हेदेखील नाशकात होते. जिल्हा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासा संदर्भात आराखड्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती घेतली.

- Advertisement -

यावेळी पाडवी म्हणाले, सर्व विभागाने योग्य समन्वय साधून जिल्ह्याला मिळालेला संपुर्ण निधी खर्च होईल असे नियोजन करावे. जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य मेडिकल कॉलेज उभारण्यात येईल . शेतीत सुधारणा, सिंचन प्रकल्प याकरिता निधी उभारण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून प्रकाशामार्गे जाणारं पाणी अधिक बॅरेज बांधून रोखणार आहेत.

जालना येथील प्रकरणावर बोलताना ते म्हणाले कि स्थानिकांनी कायदा हातात घेणं अत्यंत चुकीचं असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असेही येत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या