Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकशहरातील खाजगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार; भीती बाळगण्याचे कारण नाही

शहरातील खाजगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार; भीती बाळगण्याचे कारण नाही

नाशिक : खासगी रूग्णालयातील राखीव बेडवर कोरोनाग्रस्त रूग्ण आणल्यास त्यांचा प्रादुर्भाव इतर रूग्णांना होण्याचा धोका अधिक असतो. त्या पार्श्वभूमीवर अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

संपुर्ण देश हा कोरोना विषाणु संसर्गाच्या तिसर्‍या टप्प्यातून जात आहे. १५ दिवसांपुर्वीच संपुर्ण देशात लॉक डाऊन केले गेले आहे. असे असतानाही कोरोना विषाणु संसर्ग फैलावण्याचा वेग मोठा आहे. नाशिक जिल्ह्यातही दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात ही संख्या पंन्नासच्या घरात पोहचली आहे. प्रामुख्याने मालेगावात ही संख्या सर्वाधिक आहे.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये यासाठी आरोग्याच्या बाबत तयारी व नियोजन होत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी सर्व शासकीय रूग्णालये पुर्ण भरली तर शहरातील तसेच जिल्ह्यातील मोठ्या रूग्णालयांमधील प्रत्येकी १० बेड राखीव ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. वेळ पडल्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा हे बेड ताब्यात घेणार असल्याचे आदेशचे जिल्हाधिकार्‍यांनी खासगी डॉक्टरांच्या तसेच आयएमऐच्या बैठकीत दिले आहेत. या निर्णयास पुर्ण सहकार्य करण्याची तयारी आयएमए तसेच खासगी रूग्णालयांनी दाखवली
आहे.

दरम्यान हे सर्व करत असताना शासनाचा आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेऊनच पुढील कार्यवाही करू शकतो असेही मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली आहेत.

सर्व धोक्यांचा विचार होईल
आयएम व खासगी डॉक्टारांशी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तशा सुचना दिल्या आहेत. तो शासन आदेश असल्याने सर्वांना पाळावाच लागेल. परंतु धोका नाकारता येणार नाही. या सर्व संभाव्य धोक्यांचा पुर्ण विचार होऊन, संघटनांशी चर्चा करूनच कार्यवाही होईल. मुळात ही खूप पुढील तयारी आहे. यासाठी आपण नक्कीच सज्ज राहू
समिर चंद्रात्रे, अध्यक्ष आयएमए

भिती बाळगण्याचे कारण नाही
कोरोनाशी लढा देताना आरोग्य यंत्रणेने मोठी तयारी केलेली आहे. जिल्हा रूग्णालयात करोनाग्रस्त रूग्णांसाठी जिल्हा रूग्णालयात १०० बेड, जाकी हुसेन रूग्णालयात ७० बेड, मालेगाव सामान्य रूग्णालयात ८० बेड तर कळवण उपजिल्हा रूग्णालयात ३० बेड तसेच पवार मेडिकल कॉलेज रूग्णालय अशा रूग्णालयांमध्ये सुमारे ४०० बेडची व्यवस्था केलेली आहे.

यामुळे खासगी रूग्णालयात प्रत्येकी दहा अशा १०० बेडची तरतुद ही खूप पुढील बाब आहे. आणि कोणत्याही रूग्णालयात रूग्ण हलवताना आरोग्य पथक पुरेपूर काळजी घेणार आहे. शासकीय रूग्णालयांपेक्षा खासगी रूग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही.
डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

- Advertisment -

ताज्या बातम्या