Friday, April 26, 2024
Homeनाशिकवेतनाचे काम करण्यासाठी खाजगी आस्थापनांना ७ ते ९ एप्रिल मुभा : जिल्हाधिकारी...

वेतनाचे काम करण्यासाठी खाजगी आस्थापनांना ७ ते ९ एप्रिल मुभा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांना त्यांचे अधिकारी, कर्मचारी, कामावरील मजुर यांचे वेतनाचे काम करण्यासाठी ७ एप्रिल ते ९ एप्रिल २०२० या कालावधीत पगार व वेतन बाबींशी निगडीत शाखा चालु ठेवण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

याकामी वेतनाचे चेकवर स्वाक्षरी करणारे मालक किंवा मालकांच्या वतीने चेकवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत केलेली व्यक्ती तसेच खालील नमुद तक्त्यात नमूद केलेल्या कर्मचारी संख्येप्रमाणे वेतनाचे कामासाठी कर्मचारी उपस्थितीची मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

कर्मचारी संख्या व मनुष्यबळ
क्र. अधिकारी / कर्मचारी संख्या कंसात वेतनाचे काम करण्यासाठी मान्य मनुष्यबळ संख्या

1 1 ते 100 (1)
2 100 ते 200 (2)
3 200 ते 500 (3)
4 500 पेक्षा जास्त (4)

दिलेल्या प्रमाणात संबंधित आस्थापना मालकांनी पोलीस विभागाकडे सुरु करण्यात आलेल्या कंट्रोल रुममध्ये वेतनासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करणे अनिवार्य राहील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंडसंहिता १८६० (४५) कलम १८८ अन्वये शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सूरज मांढरे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या