Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भाजीपाल्याचे दर कडाडले; वांगी, काकडी, ढोबळी मिरचीचे वधारले

Share

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबईसह परराज्यात जाणारा भाजीपाला पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई, गुजराथ व इतर राज्यात जाणारा भाजीपाला, कांदा, बटाटा पुरवठा पुर्वपदावर आला आहे. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भाजीपाला भावात चढ उतार सुरू आहे. आवक कमी असलेली वांगी, काकडी, ढोबळी मिरची, कारले यांच्या भावात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावातील भाजीपाला व शेतमाल कमी झाला होता. समितीने किरकोळ बाजार बंद केल्यानंतर कमेटीतील लिलाव पुर्ववत झाला. नंतर जिल्हाभरातून येणार्‍या भाजीपाल्याच्या आवक मे महिन्यात वाढत गेली.

दररोज सुमारे ७ ते ८ हजार क्विंटलपर्यत होणारी भाजीपाल्याची आवक वाढत जाऊन अलिकडच्या काही दिवसात १९ हजार पर्यत गेली होती. आता देखील मार्केट कमेटीतील आवक टिकुन असुन ठराविक भाजीपाल्याची आवक कमी जास्त होत असल्याने शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत आहे. यातील वांगी, ढोबळी मिरची, काकडी, कारले, दोडका आदीच्या भावात वाढ झाली आहे.

कमेटीत वांग्याचा सरासरी असलेला प्रति क्विंटल भाव १५०० वरुन ३२५० रुपयापर्यत गेला आहे. तर ढोबळी मिरचीचा भाव २१२५ रुपयावरुन २१९० रु. पर्यत गेला आहे. तसेच फ्लॉवर ५३५ वरुन ६७५ रु., कोबी ३७५ वरुन ४१५ रु., कारले २०८५ वरुन २२१५ रु. काकडी १३७३ वरुन १६०० रु. भोपळा ५०० वरुन ९०० रु., लिंबू ४००० वरुन २५०० रु., गवार ४५०० रु. वरुन २५०० रु, भेंडी २८०० वरुन १६०० रु. अशाप्रकारे कमेटी रविवारी (दि.१७)भाव मिळाला.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरू झाला असुन व्यापारी आता लिलावात सहभागी होऊ लागले आहे. मात्र भाजीपाल्याच्या कमी जास्त होणार्‍या आवकेमुळे भाजीपाल्याच्या भावात चढ उतार सुरू झाली आहे.

यामुळे कमेटीतून मुंबई, उपनगरे, ठाणे, भिवंडी, डहाणु व पालघर, गुजरात, पुणे, इंदोर अशा भागात भाजीपाला, कांदा, बटाटा व लसुन मोठ्या प्रमाणात जाऊ लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!