Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अस्वलीहर्ष : विहीरीत पडून गरोदर महिलेचा मृत्यू; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Share
अस्वलीहर्ष : विहीरीत पडून गरोदर महिलेचा मृत्यू; पतीविरुद्ध गुन्हा दाखल Latest News Nashik Pregnant Woman Dies At Asavliharsh

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अस्वली हर्ष येथील महिलेचा गावातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ताराबाई मोतीराम भगत याअसे या महिलेचे नाव आहे. महिलेच्या मृत्युस कारणीभूत असल्याप्रकरणी पतीविरुद्ध घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तू मला आवडत नाही आदी कारणावरुन अस्वली हर्ष येथील ताराबाई मोतीराम भगत या विवाहित महिलेचा तीच्या पतिकड़ून सतत मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. त्यात आज सकाळी गावातीलच एका विहिरित या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे सततच्या जाचामुळेच ताराबाई हिने आत्महत्या केली. अशी तक्रार मयत महिलेचा भाऊ राजू काळू निरगुडे (रा. तळेगांव काचुर्ली) याने पोलिसात दिली.

या फिर्यादिवरून मयत महिलेचा पती मोतीराम काळू भगत याच्याविरुध्द पत्नीस विहिरित उड़ी मारुन आत्महत्या करण्यास प्रवुत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास घोटी पोलिस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!