Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलीस मॅरेथॉन 23 फेब्रुवारीला

Share
पोलीस मॅरेथॉन 23 फेब्रुवारीला latest-news-nashik-police-marathon-on-february-23

नाशिक । नाशिक शहर पोलिसांकडून आयोजित होणार्‍या मॅरेथॉनची जोरदार तयारी पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला पार पडणार असून, या वर्षी अभिनेता फरहान अख्तर याची उपस्थिती राहणार आहे.

शहर पोलिस दलातर्फे मागील चार वर्षांपासून दर फेब्रुवारी महिन्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेच्या यशस्वतीतेसाठी पोलिस प्रशासनाने हळुहळू यात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न केला. यंदा स्पर्धेच्या आयोजनाचे पाचवे वर्षे असून, स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. यंत्र व मंत्र भुमी असलेल्या नाशिकमध्ये खेळ संस्कृती बहरत असून, नाशिकच्या विविध पैलुंचा डंका जगभर पोहचवा, या दृष्टीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

या आयोजनाबाबत बोलताना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात आयोजीत होणार्‍या मॅरेथॉनसाठी महिलांची सुरक्षा ही थीम ठेवण्यात येणार आहे. युवा वर्गाने सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न असून, प्रथमच आम्ही स्पर्धेत सायकलींगचा सुद्धा समावेश करणार असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेचा मूळ हेतू नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद वाढणे हा असून, त्यातून परस्परविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मॅरेथॉनचे आयोजन ही मोठी बाब असून, त्यादृष्टीने नियोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. अभिनेता फरहान अख्तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!