Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशहरात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

सातपूर : शासनाने संचारबंदी व 144 कलम लागू असतानाही कोणचीही भीती न बाळतता बेधडकपणे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांनी कलम 188 अन्वये धडक कारवाई सुरू केली असून काल सातपूर परिसरात सुमारे 50 ते 60 वाहने 3 महिन्यांसाठी जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त मंगल सिंग पाटील यांच्या सोबत सातपूर पोलिस ठाण्याचे वपोनी राकेश पांडे व सहकाऱ्यांनी सातपूर परिसरात विशेष नाकाबंदी लावली. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर 188 अन्वये धडक कारवाई सुरू केली सातपूर गावच्या कमानी जवळच चेक पॉईंट लावल्याने रिकामटेकड्यांनाही पोलिसाच्या प्रसादाचा लाभ झाला.

- Advertisement -

सातपूर गावच्या कमानीजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला असल्याची सूचना मिळाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे प्रत्यक्षात सातपूर भागात भाजीबाजार बसत असताना मोठ्या प्रमाणात नागरिक वावरत होते मात्र भाजी बाजार ईएसआय मागील क्लब मैदानावर हलवल्याने गावातील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे मात्र काहीही कारणं सांगून रस्त्यावर वाहने पिटाळणाऱ्यांवर कलम 188 अन्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला ही मोहीम सलग चालू ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त विजय खरात यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांनाही अडवले
प्रभाग 26 च्या नगरसेविका हर्षदा गायकरकामानिमीत्त सातपूर गावातून पुढे जात असताना या तपासणी मोहिमेत त्यांची गाडी अडवण्यात आली सबळ कारण पुढे न आल्याने पोलिसांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले अखेर सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपण सामाजिक कार्य करीत असून त्यानिमित्ताने परिसरात जात असल्याचे पटवून दिल्यानंतर त्याचे वाहन सोडण्यात आले.

पोलिसांच्या या कारवाईबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अशा पद्धतीने कक तपासणी सतत चालू राहिले पाहिजे तरच रस्त्यावरील वाहनांना आळा बसेल अशी भावना नगरसेवीका गायकर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या