Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : वन्यपक्षांची तस्करी करणारी टोळी जेरबंद         

Share
पेठ : वन्यपक्षांची तस्करी करणारी टोळी जेरबंद latest-news-nashik-peth-wildlife-trafficking-gangs-arrested

पेठ : जंगलातील झाडांची अवैध तस्करीवर नियंत्रण आणणेसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असल्याने त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश येत असतांनाच वन्यपक्षांची तस्करीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे.

झरी वनक्षेत्रात रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना महिंद्रा कंपनीची जीजे १५ झेड ५४१९ क्रमांकाची गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. गाडीची तपासणी केली असता त्यात गावठी बंदूक, छरे, जस्ताचे तुकडे यांच्यासह ८ जिवंत व १६ मृत वटवाघुळे मिळून आली असता गाडीतील वाहन चालक हिराभाई कोंती (रा. खडकवाळ जि. बलसाड), शैलेश वडाळी, गणेश कोती, रसिक भोया, राजू कोंती, अक्षय कोंती सर्व रा. खडकवाळ ता. कापराडा जि. बलसाड व महेंदभाई कोंती (रा. सिव्हा ता. कापराडा) यांना जेरबंद करण्यात आले.

वन्यप्राणी संरक्षण अधिनियमाचा भंग करण्यात आल्याने त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहा.व्यवस्थापक व्हि.सी. ढगे , एस.एच.वाजे, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल [झरी] पी.आर.जाधव,प्रभारी वनपाल एम.पी.जोशी,आर.डी. चव्हान, वनरक्षक नितीन पवार, व्ही.एम. वानखेडे,मंगेश वाघ आदींचा समावेश होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!