Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपीएफ खात्यातील साडेचार कोटी रुपये अदा; २२३१ खातेदारांनी घेतला लाभ

पीएफ खात्यातील साडेचार कोटी रुपये अदा; २२३१ खातेदारांनी घेतला लाभ

सातपूर : लॉकडाउन मुळे भविष्य निधी सभासदास आर्थिक फटका बसू नये यासाठी भविष्य निर्वाह निधीतील उचल रक्कम काढण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अंतर्गत सभासद कोविड-१९ या कारणासाठी विना परतफेडीच्या उचल घेऊ शकणार आहेत.

नाशिक परिक्षेत्रातील एकूण २२३१ कर्मचाऱ्यांनी दहा दिवसात या योजनेचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन अर्जाद्वारे त्यांच्या बँक खात्यात एकूण ४ कोटी ५९ लाख एवढी रक्कम जमा झाली आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्यांचे काम बंद आहेत तर काही कंपन्यांचे काम वर्क फ्रॉम होम चालू आहेत. अशा बंद असलेल्या उद्योगधंद्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण होऊ नये.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यात कर्मचारी व मालकाच्या हिश्यातून जमा झालेल्या भविष्य निर्वाह निधी रकमेच्या ७५ टक्के किंवा ३ महिन्याचे वेतन इतकी रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्जाद्वारे हि रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ०१ एप्रिल पासून हि योजना सुरु करण्यात आली असून नाशिक परिक्षेत्रात येणाऱ्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हातील आज पर्यंत २२३१ एवढ्या भविष्य निर्वाह निधी सभासदांनी त्याचा लाभ घेतला असून एकूण रक्कम ४ कोटी ५९ लाख त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीत असणाऱ्या भविष्य निधी सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्री एम अशरफ यांनी केलं आहेत.

केन्द्रीय कामगार मंत्रालय, भारत सरकार यांनी करोना(कोविड १९) चा प्रादुभाव तसेच संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर कामगार व मालकाला आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केली असून त्या अंतर्गत १०० किंवा त्या पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना मार्च, एप्रिल व मे २०२० ह्या तीन महिन्याचा भविष्य निर्वाह निधी चा कामगाराचा हिस्सा १२ टक्के तसेच मालकाचा हिस्सा १२ टक्के असे दोन्ही हिस्से भारत सरकार कामगारांच्या खात्यात जमा करणार आहे.

नाशिक परिक्षेत्रात एकूण ५०३७ कंपन्यांना हा लाभ मार्च, एप्रिल, मे या महिन्यासाठी मिळणार असून त्यांना त्याद्वारे आर्थिक मदत होणार आहे असे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त एम एम अशरफ यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या