Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा | अंधश्रद्धा : प्रेमासाठी वाट्टेल ते….

Share
पारावरच्या गप्पा : गावाकडचं अंधश्रद्धेचं भूत उतरणार Latest news Nashik paravarchya gappa special Column in vividha

(सम्या, तान्या, रंग्या, भग्या, तुळश्या समदी गपचिप बसलेली )

तेवढ्यात संत्या त्यांच्यावर जवळ येतो )
संत्या : काय रे सगळे चिडीचूप… आय तान्या काय झालं…
तान्या : काय नाय र ..तू लय खुश दिसायलाय ?
भग्या : होणं , कालपर्यंत तोंड उघडत नव्हतं? का गावात येत नव्हतं.. आज काय झालं अचानक ?
संत्या : माझं लग्न ठरलं ना भो… पण तुम्ही का गपचिप हायीत ..
सम्या : अर काही नाही… ह्या तुळश्या त्या वैशीपाई पार येडा झालाय …
संत्या : का बरं , काय झालं ?
तान्या : अर ती वैशी याला नाय म्हटली… तर हे बेन सकाळापास्नं रडून रडून जाम झालया… काहीच ऐकत नाही… म्हणतोय मला तिच्याशीच लग्न करायचंय.. आता तूच बोल
संत्या : अय, तुळश्या कामून लहान पोरासारखं करायला….
तुळश्या : संत्या , यार माझं लय प्रेम होत तिच्यावर , तिने असं नव्हतं करायला पाहिजे होत. …काहीपण करा वैशी मला पाहिजे…
भग्या : जाऊदे यार, तुळश्या आआपण काहीतरी मार्ग काढू…
संत्या : एक काम करू… खालच्या पाड्यावर एक बाबा राहतोय… तो एका झटक्यात तुळश्याच काम करील ?
तान्या : काय सांगतो , चला आपण जाऊ .. (सगळे त्या बाबाकडे जातात)
बाबा : मुलांनो, हे घ्या औषध… जा तुमच्या मनासारखं होईल .. (सगळे पुन्हा पारावर जात्यात.. तेवढ्यात वैभव तिथं येतो, त्याला सगळी घटना कळते.)
वैभव : काय म, मित्रानो आमच्या तुळश्याला आता वैशी पटणार तर …
संत्या : हा म , त्या बाबांकडून औषध आणलंय , फरक पडणारंच..
वैभव : वा वा, खरं हाय तुमचं .. अरे असं बाबांच्या औषधांनी मुली पटल्या असत्या तर माणसाला भावना नावाची गोष्टच नसती… प्रेम म्हणजे प्रेम असत… ते असं ओरबाडून नाही मिळवता येत. आणि प्रेम केलं म्हणजे तो माणूस आपलाच झाला पाहिजे असंही नसतं. प्रेम हि एक भावना आहे एकमेकांना समजून घेण्याची ..तुम्हाला नाही समजणार…
तान्या : अर पण तुळश्या लय प्रेम करतो तिच्यावर ..
वैभव : अरे मग, प्रेम मिळवण्यासाठी काहीही कराल का? तीच प्रेम असेल तर ती हो म्हणेल त्याला..त्यासाठी बाबा, बुवा करायची काय गरज ?
तुळश्या : वैभव, चुकलो यार खरंच .. नाही म्हणजे खूप वाहून गेलो होतो याच्यात ..त्यामुळे काहीच सुचत नव्हतं.. तू डोळे उघडले बघ…
संत्या : व्हय, वैभ्या ..म्याच त्याला सांगितलं.. पान आता त्याच प्रेम आम्ही प्रेमानेच मिळवूं देणार ..
वैभव : आपल्या तरुण पिढीला हे कळालं म्हणजे लय झालं.. अर आपल्या गावात अजुनबी अशा लय अंधश्रद्धा आहेत, त्या मुळापासून उखडून फेकायला हव्यात, त्यासाठी आपण तरुणांनी झटलं पाहिजे, बाबा, बुवा गावातूनच हद्दपार केले पाहजे, जनजागृती झाली पाहिजे.. तेव्हाच गावातलं अंधश्रद्धेचं भूत जाईल.
समदी : अगदी १०० टक्के (तेवढ्यात तुळश्याला वैशीचा कॉल येतो, अन समदे हसायला लागतात)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!