Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोनाच्या पार्श्वभूमीवर विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवण्याचे आदेश : भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवण्याचे आदेश : भुजबळ

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील पुढिल सत्र बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे सावट भारतावरही पसरले आहे. या दृष्टीने राज्यातही ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. शहरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना येण्यास मज्जावकरणे आवश्यक आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी परदेशातून आलेल्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक असून अशी माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच जिल्ह्यातील सर्व हाँटेलांना परदेशातून आलेल्या यात्रेकरुंची माहिती देणे बंधनकारक अन्यथा कारवाई.

आतापर्यंत शहरात बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अहवाल हा निगेटिव्ह आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. प्रशासन याबाबतीत सजग असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये,असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या