जीवनावश्यक वस्तुंच्या मालवाहतुकीचे परवाने ऑनलाईन मिळणार

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । कोरोना विषाणुंचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांची संचारबंदी लागू केलेली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या मालवाहतुकीसाठी वाहनांना परवाना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीव्दारे वाहन धारकांना घरबसल्या कार्यालयात न जाता ऑनलाईन परवाना प्राप्त होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.

याकरिता वाहनमालकांनी www. transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Apply for e – passes for goods vehicles या लिंकवर क्लिक करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरुन अर्ज करावा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाव्दारे परवाना जारी केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर परवाना जारी केल्याबाबतचा संदेश अथवा ई-मेल प्राप्त होईल, या संदेशमधील अथवा ऊ-मेल मधील लिंकव्दारे अर्जदार परवान्याची प्रिंट काढू शकेल.

अर्ज केल्यानंतर कार्यालयात परवान्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नाही, तसेच दूरध्वनीद्वारे देखील संपर्क करण्याची आवश्यकता नाही. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या सर्व वाहतुकदारांनी या प्रणालीव्दारेच अर्ज सादर करावा, अन्य मार्गांनी अर्ज केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *