Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिमकार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांना गंडा

सिमकार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांना गंडा

नाशिक : मोबाईलचे सीमकार्ड फोर-जी मध्ये ऍक्टिव्हेट करून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयिताने एकाच्या बँक खात्यातील रक्कम व त्यांच्या नावावर ऑनलाईन पर्सनल लोन काढून तब्बल आठ लाख ४९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी राकेश सुखदेव आहेर (रा. आनंदघन कॉलनी, बुरकुले हॉलमागे,नविन नाशिक अंबड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या सोमवारी (ता.०१) दुपारी दीड वाजता अज्ञात संशयिताने फोन केला आणि त्याचें आयडीया कंपनीचे मोबाईल सीमकार्ड फोर-जी मध्ये ऍक्टिव्हेट करून देण्याचे आमिष दाखविले. त्यास भूलून संशयिताने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून रोकड आणि त्यांच्याच नावे पर्सनल लोन मंजूर करीत तब्बल आठ लाख ४९ हजार ५७८ रुपयांचा गंडा घातला.

- Advertisement -

याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या