Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (एमयूएचएस) आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. या बैठकीत विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता योग्य पध्दतीने शिक्षणक्रमाचे व परीक्षांचे परिस्थितीनुसार योग्य ते नियोजन करावे असे मार्गदर्शन भगत सिंह कोश्यारी यानी केले आहे.

डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंची कुलपती यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिग बैठकीत सद्य स्थितीत विद्यापीठाच्या एकूण कार्यप्रणाली विषयी माहिती देण्यात आली.

- Advertisement -

तसेच आरोग्य विद्यापीठाच्या एकूण कार्यप्रणाली विषयी त्यांना अवगत करण्यात आले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाशी संबंधित ऑनलाईन लेक्चर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरोग्य विद्यापीठाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

यामुळे आरोग्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास व माहितीकरीता त्याची मोठया प्रमाणत मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातील सर्व महाविद्यालय व संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात इन्फॉरमेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नालॉजीचा प्रभावी वापर करणेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेशित केले आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे संकेतस्थळावर व व क्लाउड सर्वेवर 700 पेक्षा अधिक रेकाॅर्डेड लेक्चर, पॉवर पॉईन्ट सादरीकरण अपलोड केले आहेत.

विद्यापीठाने ’झुम’ सॉफ्टवेअरव्दारा ’लाईव्ह लेक्चरची’ सुविधा उपलब्ध करुन दिली असून विविध विषयांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे संकेतस्थळावरुनया लेक्चरचा लाभ घेता येणार आहे.

तसेच विद्यार्थी इंटरनेटव्दारा संगणक, मोबाईल व टॅब्लेटवर लाईव्ह लेक्चर व एकमेकांशी संवाद साधता येणार आहेत. विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाकरीता एमयूएचएस लर्निंग नावाने यु-टयुब चॅनेल सुरु केले असून आजपर्यंत तीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

ऑनलाईन शिक्षण प्रणालीसंदर्भात विद्यापीठाने ऑमनिक्युरस संस्थेशी सामंजस्य करार केला असून आरोग्य शिक्षण प्रणालीचे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान उपलब्ध होणार असून विविध विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या