Friday, April 26, 2024
Homeनाशिकअंबड : लग्नाचे आमिष दाखवून ३८ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा

अंबड : लग्नाचे आमिष दाखवून ३८ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा

नाशिक : लग्नाच्या ऑनलाईन संकेतस्थळांवर बोगस सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून एकास आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ नेहा जोशी, महेंद्र जोशी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नावे आहे. याप्रकरणी सचिन ठोके ( रा, वनश्री कॉलोनी, अंबड) यांने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, जोशी यांची विवाह जमविणारी संस्था आहे, त्याच्या संकेस्थळावर ३१मार्च ते ७ एप्रिल या दरम्यान डॉ. नेहा जोशी या लग्नासाठी नोंदणी केली.

- Advertisement -

त्यावर नेहा हि शासनाच्या आरोग्य विभागात उपसचिव असल्याचे ओळखपत्र होते. तसेच तिचा भाऊ महेंद्र जोशी यानेही सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण मध्ये असल्याचे भासविले. संस्थेमार्फत अजिंक्य बारगजे यांच्याशी लग्नाचे अमिष दाखवून ३८ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला.

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या