Friday, April 26, 2024
Homeनाशिकचांदवड बाजार समितीच्या आवारात आजपासून कांदा लिलाव

चांदवड बाजार समितीच्या आवारात आजपासून कांदा लिलाव

नाशिक : चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावरील कांदा शेतीमालाचे लिलाव मंगळवार (दि.१९) पासुन नियमित सुरु होत आहे. शेतकरी, व्यापारी, मापारी व हमाल यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी लिलाव झालेनंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेले सोबत आणावे. लिलावास येतांना पुढीलप्रमाणे नियम पाळावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.कांदा लिलाव दैनंदिन सुरु राहतील.

- Advertisement -

कांदा लिलावासाठी नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कांदा लिलाव मोकळ्या स्वरूपात निवड व प्रतवारी करुन विक्रीस आणावा. शेतकरी बांधवांनी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतर (सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत) आवारात यावे. रात्री मुक्कामी येणा-या वाहनांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही. एका दिवसात ४०० ते ५०० वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.

शेतकरी बांधवांनी बाजार समितीत आल्यानंतर आप-आपल्या वाहनाजवळच थांबावे, तसेच एका वाहनाबरोबर एकाच व्यक्तीने यावे. लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करु नये. ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल त्या शेतक-यानेच वाहनाजवळ थांबावे. गर्दी करु नये किंवा समुह करुन बसु नये.

प्रत्येक शेतक-याने किमान ५ ते १० फुट अंतर ठेवून ट्रॅक्टर लावावे. तसेच आवारात येण्यापुर्वी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधुन यावे. आवारात आल्यानंतर कुठेही थुंकू नये. धुम्रपान करु नये. आजारी व्यक्तीने बाजार समितीत कांदा शेतीमाल विक्रीस येऊ नये अथवा बाजार आवारात प्रवेश करु नये.

बाजार समितीचे आवारावर शेतकरी बांधव व बाजार घटकांसाठी हात, पाय स्वच्छ धुण्याची व्यवस्था केलेली असुन ठिक-ठिकाणी ३० ते ४० लिटरचे ड्रम व त्यासोबत साबण ठेवण्यात आलेली आहे. त्याचा दैनंदिन व वेळोवेळी वापर करण्यात यावा. बाजार समितीचे मुख्य गेटवर निर्जुंतुकीकरण कक्षाची निर्मीती करण्यात आलेली असुन आवारत येणाऱ्या सर्व घटकांनी त्याचा नियमित वापर करावा.

सर्व बाजार घटकांनी शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनांचे स्वंयस्फुर्तीने काटेकोर पालन करावे व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन सभापती,उपसभापती यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या