Friday, April 26, 2024
Homeनाशिकरामवाडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार तर चक्कर येऊन पडल्याने एकाचा...

रामवाडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार तर चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७६ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१३) सकाळी रामवाडी परिसरातील कोशिरे मळा भागात घडली.

वाळू गंगाराम गायकवाड (७६ रा.निळवंडी ता. दिंडोरी) असे या अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सोमवारी सकाळी गायकवाड साडे नऊ वाजेच्या सुमारास कोशिरे मळा भागातील रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती.

- Advertisement -

या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चोपडे करीत आहेत.

सातपूर : चक्कर येवून पडल्याने एकाचा मृत्यु

नाशिक : रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील बॉश कंपनी परिसरात घडली.

रविंद्रनाथ बॅनर्जी (५० रा.अशोकनगर,सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बॅनर्जी शुक्रवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून पायी जात असतांना ही घटना घडली. बॉश कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ पायी जात असतांना अचानक चक्कर येवून ते पडले होते. त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यु झाला.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या