Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा-मालेगाव मार्गावर ट्रक व स्विफ्ट कार अपघातात एकाचा मृत्यू

Share
देवळा-मालेगाव मार्गावर ट्रक व स्विफ्ट कार अपघातात एकाचा मृत्यू Latest News Nashik One killed in Truck, Swift Car Accident on Deola-Malegaon Road

देवळा : देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेशनिंगचे धान्य सटाणा येथे पोहोचवून मनमाड कडे परत जाणारा ट्रक (एमएच१२ एफझेड ५८५८) व पिंपळगाव (वा.) कडून येणारी स्विफ्ट कार ( एमएच१५ जीएक्स ८४५६ ) यांचा खुंटेवाडी फाटा जवळील वळणावर कट लागल्याने अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने चालक धनराज कारभारी गायकवाड रा.मनमाड (वय ५५) याचा मृत्यू झाला तर ट्रकमधील गोरख मधुकर थोरे रा. मनमाड व स्विफ्ट कार मधील प्रतिभां चेतन छाजेड रा. वडाळीभोई असे दोन जण जखमी झाले.

पुढील उपचारासाठी जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत रस्ता मोकळा असल्याने वाहने वेगात असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!