Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | त्र्यंबकेश्वर : हिरडी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

Share
त्र्यंबकेश्वर : हिरडी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी latest-news-nashik-occasional-rains-in-hirdi-area-near-trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या सारी कोसळल्या.  बुधवार (दि. २५) रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील काही भागात सव्वा आठच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली.

दोन दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी वेधशाळेने पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार तालुक्यातील हिरडी, रोहिले परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी पडल्या.पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी रचून ठेवण्यात आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकऱ्यांनी यावेळी पावसातच या रचलेल्या उडव्यावर संरक्षणासाठी कापडाचे आच्छादन करण्यात आले.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली तसेच शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अगोदरच परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे, भुईमूग, बाजरी यासह खरिपाच्या इतर पिकांची नासाडी केलेली असतांना आता अवकाळी पावसाने बळीराजा चिंतीत झाला आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!