Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळा : लॉकडाऊनमुळे यंदा कर्तव्य नाही; वाजंत्र्याची उपासमार

देवळा : लॉकडाऊनमुळे यंदा कर्तव्य नाही; वाजंत्र्याची उपासमार

वाजगाव : जगभरात सुरु असलेल्या करोना प्रादुर्भावाने अनेक गोष्टींना आळा बसला आहे. अनेकांची लग्न थांबली आहेत. बेंजो, वाजंत्री यांच्यावर लग्न थांबले, ब्यांजो व्यवसायिकांचे उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक नुकसान झाले तर वाजंत्रित यामुळे लॉकडाऊन उघडून विवाह सोहळे सुरु व्हावे, रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे मिळतील अशी आशा बेंजो व्यावसायिकांना लागून आहे.

करोना प्रादुर्भावाने महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंतचा लॉकडाऊन व कलम १४४ अन्वये संचार बंदी लागून केल्याने पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येणे, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम व विवाह सोहळा करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू असल्याने देवळा तालुक्यासह संपूर्ण देशभरात बहुतांश नवयुवक व युवतींच्या आई – वडिलांनी आपल्या नवयुवक व युवतींचे लॉकडाऊन पूर्वी विवाह सोहळे जुळवून ठेवले तर काहींचे विवाह मार्च व एप्रिल या महिन्यात असल्याने तारखा, वेळ, ठिकाणे नियोजित केली गेली.

- Advertisement -

वर-वधू पित्याने विवाहासाठी लॉंन्स – मंगलकार्याल, मोठ मोठे वाजंत्री, केटरिंग, लग्नासाठी मोठ्याप्रमाणात व-हाडी राहवी म्हणून वाहनांची लॉकडाऊन आधीच बुकिंग करून ठेवली आहे. करोना प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम बंद करण्याच्या शासनच्या निर्देशामुळे विवाह सोहळ्यासाठी वर-वधू पित्याचे पैसे अडव्हांन्स अडकुन पडले तर दुसरीकडे आपल्या मुला-मुलीचे लग्न थांबल्याने आई-वडील मोठ्या विवंचनेत असल्याचे दिसुन येत आहे.

बेंजो व्यवसायिकांनी व वाजंत्री म्हणून काम करणाऱ्या युवकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे.
विवाह नसल्याने रोजगार मिळत नसून कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न या युवकांपुढे निर्माण झाला आहे.

१५ एप्रिल रोजी मुलाचे लग्न होते. करोनाचे संकट दाराशी आल्याने आनंदावर विरजण पडले. हजारो रुपये मोजून बेंजो1 ठरविला होता. परंतु लॉक डाऊन मुळे सर्व नियोजनावर पाणी फेरले आहे.
– प्रकाश मोहन, सरपंच

करोनाचे सावट असल्याने लग्नसोहळे बंद पडले असून मजुरीचे कामे थांबली आहेत. परिणामी हाताला काम नसल्याने कुटुंब चालवणे अवघड झाले. कधी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि विवाह सोहळे चालू होतील याकडे लक्ष लागून आहे.
– सुरेश सोनवणे, वाजगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या