Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांनो! आता तक्रारींचा पाढा नोंदवा ‘माझा महापौर’ अँपवर

Share
नाशिककरांनो! आता तक्रारींचा पाढा नोंदवा 'माझा महापौर' अँपवर Latest News Nashik NMC Suggest Report Your Complaint to 'Maza Mahapaur' App

नाशिक : शहरातील नागरिकांनी समस्या सोडविण्यासाठी तसेच नाशिकच्या विकासात भर घालण्यासाठी आपल्या तक्रारी किंवा प्रतिक्रिया माझा महापौर या अँपवर टाकून सहभाग नोंदवावा असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले आहे.

दरम्यान नाशिक शहराच्या विकासात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा यासाठी या अँप ची निर्मिती करण्यात आली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून काम करत असताना शहरवासीयांच्या शहराबद्दल असणाऱ्या विविध संकल्पनांना वाव मिळावा या उद्देशाने माझा महापौर अँप कार्यान्वित केले आहे.

सदर ॲप वर सर्व शहरवासीयांनी त्यांच्या मनातील नाशिक शहराबद्दलच्या संकल्पना, प्रतिक्रिया नोंदवाव्यात तसेच ज्या नागरिकांना नागरी सुविधांबाबत समस्या भेडसावत असल्यास त्या समस्या माझा महापौर अँपवर नोंदवून शहर विकासाच्या दृष्टीने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा.

शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर या नात्याने नागरिक व प्रशासन यांच्यामधील समन्वय वाढावा व शहराच्या दृष्टीने विकासात्मक कामे नागरिकांना कळावी हया भुमिकेतून सदरचे ॲप सुरु करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!