नाशिक मनपातर्फे प्राथमिक शिक्षकांसाठी हास्ययोग

नाशिक मनपातर्फे प्राथमिक शिक्षकांसाठी हास्ययोग

नाशिक : महानगरपालिकेचे महापौर मा.सतिष नाना कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग व नाशिक हास्य योग समिती यांचे वतिने मनपातील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांसाठी हास्ययोग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन महापौर सतीश नाना कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदिश पाटील, हास्ययोग समितीचे राष्ट्रीय संस्थापक डॉ मदन कटारिया,सहसंस्थापक माधुरी कटारिया, मा.नगरसेवक संजय बागूल, अतिरिक्त आयुक्त बी.जे सोनकांबळे, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, हास्ययोग समितीच्या ट्रेनर आदिती वाघमारे, विनायक शास्त्री, आदिशक्ती श्रीप्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

मनपा शाळेतील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकाना निरोगी आरोग्यासाठी, बौध्दिक थकवा घालविण्यासाठी, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, शालेय विद्यार्थीना हस्य योग शिकविण्यासाठी ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हास्य योग क्लबचे राष्ट्रीय संस्थापक डॉ.मदन कटारिया यानी हास्ययोगाचे महत्व सांगितले सर्वाना विविध प्रकारे हास्ययोगाची प्रात्येक्षिके करुन हसविले.

जगभरातील हास्ययोगाचे कार्यक्रम स्क्रिनवर दाखविण्यात आले. हास्ययोग कार्यक्रमात महापौरासह सर्व मान्यवर ,शिक्षकशिक्षिका यांनी सहभाग घेउन आनंद घेतला. कार्यक्रमप्रसंगी सभागृहनेते सतीश सोनवणे, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यानी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com