Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

ञ्यंबकेश्वर : पैशाच्या देवाण घेवाणीतुन सापगाव येथे युवकाचा खुन

Share

ञ्यंबकेश्वर :

ञ्यंबकेश्वर शहरापासुन ३ कि. मि. अंतरावर असलेल्या सापगाव येथील गोकुळ नामदेव दिवे (वय 20) या युवकाचा खुन झाला आहे. मंगळवारी सकाळी हि घटना उघडकीस आली. खबर मिळताच ञ्यंबकेश्वर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याबाबत कैलास नामदेव दिवे या मयताच्या भावाने फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फिर्यादी नुसार सोमवार (दि. 2) रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान, संशयीत आरोपी यशवंत सदु दिवे, भगवान सदु दिवे, गोविंद सदु दिवे आणि सदु मंगळु दिवे सर्व राहणार सापगाव यांनी संगनमत करून मयत गोकुळ नामदेव दिवे याच्या सोबत भांडण केले. मयत गोकुळ याने भगवान सदु दिवे याचे कडे मोटार सायकल घेण्यासाठी दिलेले 10 हजार रूपये परत मागीतले. या कारणावरून कुरापत काढली व काहीतरी धारदार टणक हत्याराने गोकुळ यास मारहाण करून जीवे ठार मारले अशी फिर्याद दिली आहे.

खुनाचा प्रकार सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडला आहे. मंगळवारी सकळी 7 वाजता गावाबाहेर असलेल्या गायरानावर गोकुळ मयत आढळून आला. दरम्यान ञ्यंबक पोलीस ठाण्यात वरील संशयीत आरोपींच्या विरूध्द भादवि कलम 302, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी 3 व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू आहे. ञ्यंबक पोलीस ठाण्यात मंगळवारी दिवसभर सापगाव येथील ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता. संशयीतांना आमच्या ताब्यात द्या म्हणून मयताचे नातेवाईक आक्रेाश करत होते. पोलीस अधिक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उप अधिक्षक भिमाशंकर ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!