Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘सामाजिक भान’ विषयावरील ‘देशदूत’च्या लघुपट स्पर्धेत सहभागी व्हा!

Share

नाशिक । प्रतिनिधी

समाजात कोणताही बदल- परिवर्तन घडवायचे झाल्यास त्यांची सुरुवात आपण स्वत:पासून केली पाहिजे, तेव्हाच बदल-परिवर्तन घडते. या सूत्राला अनुसरून उत्तर महाराष्ट्रात विकासाचा शिल्पकार ठरलेल्या ‘देशदूत’यांच्या वतीने सामाजिक भान विषयावर जनजागृती केली जात आहे. यात सर्वांना सहभागी करून घेतले जात आहे.याच सामाजिक भान या विषयावर पन्नास सेकंदांची शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्यात येत असून सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘देशदूत’कडून करण्यात आले आहे.

सामाजिक भान म्हणजे काय? याची जनजागृती ‘देशदूत’कडून गेल्या महिनाभरापासून केली जात आहे.आपल्या अवतीभोवती घडणार्‍या लहान गोष्टीतून समाजाला शिस्त लागू शकते. यातून सशक्त व सदृढ समाज-देश घडू शकतो, हेच लक्षात घेऊन दैनिक‘देशदूत’कडून ‘सामाजिक भान’ आत्मसात करा आणि त्यांची आपल्यापासून अंमलबजावणी करा,असे आवाहन केले जात आहे. बातम्या, तज्ञांच्या मुलाखती, सामाजिक भान यासंदर्भातील कार्यक्रम, घोषवाक्य, चित्र- छायाचित्रांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

समाजात आजही सामाजिक भान यासंदर्भात अनभिज्ञता मोठ्या प्रमाणात आहे. आजही पोटाला लागणार्‍या अन्नापेक्षा जास्त अन्न ताटात घेऊन नंतर उष्टे टाकत अन्नाची नासाडी केली जाते. ही नासाडी थांबवून हे अन्न उपाशी असलेल्यांच्या पोटात जाऊ शकते. वाढत्या जल व वायू प्रदुषणास आपणच जबाबदार असून हे प्रदूषण आपणच रोखू शकतो. पर्यावरणाचा र्‍हास आपण रोखून पर्यावरण संवर्धन आपणच करू शकतो. वाहतूक नियम पाळण्याची जबाबदारी आपलीच आहे.

नम्रता या गुणाने दुसर्‍याचे मन जिंकता येते, हे इतरांना आपणच समजावून सांगितले पाहिजेत. वृद्ध व दिव्यांगांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. रस्त्यावर कचरा न टाकण्याची सवय सार्वजनिक अस्वच्छतेच्या आजारावर रामबाण उपाय आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे  व धुम्रपान  न केल्यास इतरांचे आरोग्य अबाधित राहील.

अशाप्रकारे अगदी शुल्लक वाटणार्‍या सामाजिक भान संदर्भातील गोष्टीने समाजात मोठा बदल आणि परिवर्तन घडणार आहे. ही भूमिका घेऊन ‘देशदूत’ ने सामाजिक भान यासंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. याकरिताच वरील सामाजिक भान या विषयावर ‘देशदूत’ने 50 सेकंदांची शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली आहे. यात सहभागी होण्याची मुदत येत्या 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेत असे आवाहन ‘देशदूत’कडून करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा – www.deshdoottimes.com 

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!