Type to search

Featured नाशिक

सराफाला अडीच लाखाला गंडा

Share

नाशिक :

सराफ बाजारातील कारागिराने मंगळसूत्र बनविण्यासाठी सराफाकडून घेतलेली सोन्याची अडीच लाख रुपयांची लगड घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्युंजय महादेव कांजी (रा. बाणहिजाली, हुबळी, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित कारागिराचे नाव आहे. या प्रकरणी संजय वसंतराव उदावंत (रा. सराफ बाजार) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने 2 लाख 40 हजार रुपयांची सोन्याची लगड घेत, त्यापासून सोन्याचे मंगळसूत्र तयार करून न देता त्या सोन्याचा अपहार केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!