Saturday, April 27, 2024
Homeनाशिकराज्य पोलीस स्पर्धा स्थगित; करोनाच्या वाढत्या प्रभावाने पोलीस महासंचालकांचा निर्णय

राज्य पोलीस स्पर्धा स्थगित; करोनाच्या वाढत्या प्रभावाने पोलीस महासंचालकांचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

जगभरासह देशात वाढत चाललेल्या करोनाच्या प्रादुर्भावाच्या परिणामी नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे 19 ते 25 मार्च या कालावधीत आयोजीत होणार्‍या 32 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

- Advertisement -

करोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भाच्या परिणामी शासनाने सार्वनीक कार्यक्रम जपून करण्याचा सल्ला दिला आहे. याच्या परिणामी नाशिक शहरात होणार्‍या राज्यस्तरीय पोलीस स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश लवकरच नाशिक परिक्षेत्रातील सर्व अधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहेत.

शहरात शहरात 2014 नंतर या स्पर्धा आयोजनाचा मान नाशिक परिक्षेत्राला मिळाला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणार्‍या संघांना पुढे देशपातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होता येते. या स्पर्धेत 2900 पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच 900 महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार होते. पाच वर्षांनी नाशिकला आयोजनाचा मान मिळाला असून, स्पर्धेचे उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते तर, समारोपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार होते.

या स्पर्धेमध्ये फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, जलतरण, अ‍ॅथलॅटीक्स, क्रॉसकंट्री, मॅरेथॉन, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलेफ्टिंग, रायफल शुटींग आदी किमान 16 प्रकारच्या खेळ प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धांची जय्यद तयारी पोलीस प्रबोधिनीत चालू होती. यासाठी लाखो रूपये खर्चून मैदाने तयार करण्यात आली आहेत. तर याच्या तयारीसाठी दोन दिवसांपुर्वीच अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव सिंगल, संजय सक्सेना, पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी भेट देऊन आयुक्तलायात बैठक घेतली होती. या बैठकीला परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग उपस्थित होते. या स्पर्धा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या