Type to search

Featured नाशिक

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा : नाशिक व युनायटेड आघाडी विजयी

Share

यासर शेख 137 धावा, सत्यजित बच्छाव  9 बळी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये काल 24 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (सीनियर इन्विटेशन लीग) दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने अहमदनगरवर तर दुसर्‍या सामन्यात युनायटेड, पुणेने सातारा विरुद्ध पहिल्या डावात आघाडीचे गुण मिळविले.

शतकवीर, आघाडीचा फलंदाज यासर शेखच्या 137 व रणजीपटु सत्यजित बच्छावच्या भेदक डावखुरया फिरकीच्या-सामन्यात एकुण 9 बळी-जोरावर नाशिक संघाने अहमदनगरला फॉलोऑन दिला पण अहमदनगरने निर्णायक पराभव टाळला.

सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल पुढीलप्रमाणे :

महात्मा नगर क्रिकेट मैदान – नाशिक विरुद्ध अहमदनगर – नाशिक नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव – 7 बाद 336 (78 षटके ) डाव घोषित – यासर शेख 137, कुणाल कोठावदे 54, सौरभ गडाख 52. सय्यद कादिर 4 बळी,

अहमदनगर पहिला डाव – सर्वबाद 184 – श्रीपाद निंबाळकर 89,संदीप अडोळे 36. सत्यजित बच्छाव 8 तर यासर शेख 2 बळी,

अहमदनगर दुसरा डाव (फॉलोऑन नंतर) – सर्वबाद 218 – अझीम काझी 73, श्रीपाद निंबाळकर 35. तेजस पवार 6, समाधान पांगारे 2 तर सत्यजित बच्छाव व यासर शेख प्रत्येकी 1 बळी.

सामना अनिर्णीत – नाशिक ला पहिल्या डावातील आघाडीचे गुण.

सय्यद पिंपरी क्रिकेट मैदान – सातारा विरुद्ध युनायटेड – सातारा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव – सर्वबाद 192 – अभिमन्यु जाधव 60,आकाश जाधव 39, पराग मोरे 4 तर रामकृष्ण घोष 2 बळी

युनायटेड पहिला डाव –सर्वबाद 223 – अवधूत दांडेकर 89. संकेत यशवंते 5 तर आकाश जाधव 3 बळी .

सातारा दुसरा डाव – 5 बाद 139 – रजनीकांत पडवळ 64.संजय परदेशी 2 बळी.

सामना अनिर्णीत – युनायटेडला पहिल्या डावातील आघाडीचे गुण.

उद्या 26 तारखेच्या विश्रांती नंतर 27 व 28 रोजी पुढील साखळी सामने होतील.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!