Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

संत निवृत्तीनाथ यात्रा सुरळीत पार पडली; शासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात

Share

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

संत निवृत्तीनाथ यात्रा एकादशी उत्साहात व सुरळीत पार पडली दि. 21 ला द्वादशीला भाविक त्र्यंबकेश्वर मधून दुपार नंतर परत प्रवास सुरु करतील तथापी देशातील विविध ठिकाणीचे वातावरण गर्दीत होणाऱ्या आपत्ती या सर्व दृष्टीने नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस यंत्रणा, नगरपालिका व विवध शासकीय खाते, तहसील, आरोग्य यंत्रणा, वाहतूक जादा बसेस महामंडळ, पोलीस बंदोबस्त

संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट या सर्वाचे नियोजन होते. येथे प्रथमच आपत्ती वयवस्थापन कायदा लागू होता. सुदैवाने यात्रा सुरळित पार पडली त्यामुळे वरील यंत्रणा प्रमुखांंचा जीव भांड्यात पडला आहे. अतिक्रमण हटाव जोरात होते. त्यामुळे पदचारी मार्ग मोकळे होते. पण दुकाने गाळे कमी झालेने पालिकेचे उत्पन्न घटेल असे दिसते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!