Type to search

Featured नाशिक

इंदिरानगर : कुरापत काढत एकास जबर मारहाण

Share

इंदिरानगर | वार्ताहार

चार चाकी वाहन वापरण्यासाठी दिले नाही व फोन उचलत नाही अशी कुरापत काढत कारमध्ये बळजबरीनं बसून सिन्नर एमआयडीसी येथे नेऊन एकाला लाकडी काठ्या व प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व नितीन वाडेकर (वय 33 रा. यश प्रतीक आपारमेंट, मॉडेल कॉलनी, जेल रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अर्जुन पिवाल, मन्ना गांगुर्डे रा. मॉडेल कॉलनी, जेलरोड, सनी पगारे रा. गोसावीवाडी, नाशिक रोड, गणेश उर्फ झगड्या भाई राहणार पंचवटी यांनी (दि. ४ बुधवार) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र पाथर्डी शिवारात हॉटेलमध्ये पार्टी करत असताना तेथे आले व कुरापत काढत तू वापरण्यासाठी चार चाकी गाडी का दिली नाही? आमचा फोन का उचलत नाही? तू माजला आहे. तुझा माज ऊतरवतो.. असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून बळजबरीने गाडीत बसून सिन्नर एमआयडीसी येथे घेऊन लाकडी काठ्या व पाईपने जबर मारहाण करत जखमी केले. तसेच तू जर आम्हाला चार चाकी वापरण्यास दिली नाही तर तुझा गेम करून टाकू अशी धमकी देऊन तिथेच सोडून गेले व फिर्यादी यांची चारचाकी बरोबर घेऊन गेले.

त्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी औषध उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!