Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक : ४०० वर्षांची परंपरा असलेली बडी दर्गा शरीफचे द्वार बंद!

Share

जुने नाशिक | प्रतिनिधी

‘कोरोना’ च्या पार्श्‍वभुमीवर देशभरातील लहान मोठे मंदिर, दर्गा शरीफ व मशिदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या सर्वधर्मीय बांधवांचे श्रध्दास्थान असलेले पीर सय्यद सादीक शाह हुसैनी बाबा यांची पवित्र बडी दर्गा शरीफ दर्शनासाठी ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विश्‍वसतांनी घेतला आहे.

दरम्यान, आज संपूर्ण बडी दर्गा शरीफ व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. विश्‍वसतांनी केंद्र व राज्य सरकाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत दर्गा शरीफ दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रविवारी रात्री पवित्र शब-ए-मेराजचा सण आहे. मुस्लिम बांधव मशिदींमध्ये इबादत करणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!