Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंडे यांच्या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी नाशिकचा चिवडा

Share

नाशिक :

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेत असो वा नसो आपला कारभार ज्या कार्यालयातून चालवला त्याच वास्तू मधून पंकजा मुंडे यापुढे आपले कामकाज सुरू करत आहे. येत्या बुधवारी 12 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता. 15 शुभदा अपार्टमेंट, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथील कार्यालयाच्या वास्तूचा शुभारंभ होत आहे.

याच कार्यालयातून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोर-गरीब, वंचित, उपेक्षितांचे प्रश्न सोडवले. कार्यालयात मोठ्या अपेक्षेने कामे घेऊन येणाऱ्या शेवटच्या माणसाला भेटून त्याचे काम मार्गी लावूनच रात्री उशिरा मुंडे कार्यालयाच्या बाहेर पडायचे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेला हा नेता अगदी पोलीस निरीक्षकाला हि फोन लावून संबंधितांचे प्रश्न सोडवायचा. ग्रामीण भागातून येणाऱ्या चे काम मार्गी लावून त्याला आस्थेने चहा-नाश्ता देऊन, परत जाण्यास भाड्यासाठी पैसे नसतील तर प्रेमाने विचारपूस करून भाड्यासाठी पैसे सुद्धा देत. असे अनेक प्रसंग आजही लोक सांगतात. मुंडे यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या कडे संबंधित व्यक्तीचा,संस्थेचा फोन नंबर तयार असायला हवा. मुंडे ताबडतोब फोन लावून गोपीनाथ मुंडे बोलतोय..

ह्या त्यांच्या शैलीत फोन लावत आणि कामे मार्गी लावायचे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील गरीब,वंचित माणसाला हे कार्यालय आधार केंद्र वाटायचे. आणि मुंडे कार्यालयात असतील तेव्हा तेथे जत्रेचे स्वरूप असायचे. याच कार्यालयाच्या वास्तूचा पुन्हा शुभारंभ करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपला कारभार पुढे चालवणार आहेत. राजकारण व समाजकारणात संपर्क महत्त्वाचा असल्याने पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी हे ठिकाण आता निश्चित असेल.

या कार्यालयाच्या शुभारंभा प्रसंगी महाराष्ट्र राज्यातून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असून या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या शुभारंभा प्रसंगी येणाऱ्या प्रत्येकास भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगराचे सरचिटणीस व रेणुका फुड्स नाशिक चिवडा चे संचालक अमित घुगे हे आपल्या वतीने चिवड्याचे पाकीट भेट म्हणून देणार आहेत. त्यांनी 4000 पाकीट तयार केले असून ते मंगळवारी 11 फेब्रुवारीलाच कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!