Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककर बिनधास्त वाहतूक; बाजारपेठा सुरळीत

Share

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारपेठा, यात्रोत्सव रद्द करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यातील शाळांही बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. मात्र नाशिककरांना करोनाची भिती नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून शहरातील बाजारपेठेत नेहमीचीच असलेली गर्दी (दि. 16) सोमवारी सुद्धा पाहायला मिळाली. यासह सार्वजनिक वाहतूक तसेच व्यवहारही सुरळित सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सर्वत्र ‘गो करोना, करोना गो’ म्हणून हस्याचे फवारे उडविले जात असल्याचे दिसत आहे. सर्वत्र घबराटीचे वातवरण असून नाशिककर मात्र निर्धास्त असल्याचे अनेक ठिकाणच्या गर्दीवरून पाहायला मिळते आहे. करोनाची धास्ती असल्याने नाशिककरांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.

तोंडाला रुमाल, मास्क व हॅन्ड सॅनिटायझर वापरण्यास सुरूवात केल्याचे दिसते आहे. नाशिकमध्ये एकही कोरोनाबाधित नसल्याचा फायदा नाशिककर घेत असून नेहमीप्रमाणे वर्दळीचा व गर्दीचा शालिमार, रविवार कारंजा व मेनरोड परिसर सोमवारीही नाशिककरांच्या गर्दीने फुलून गेला होता. तसेच शरणपूर रोड, कॉलेजरोड व गंगापूर रोड भागातील व्यवहार पूर्ववत सुरू होते.

वाहतूक कोंडी

रविवार कारजा येथे सोमवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अत्यावश्यक साहित्य, किराणा घेण्यासाठी नागरीकांनी रविवार करांजा येथे गर्दी केली होती. त्यामुळे नित्यक्रमानुसार येथे वाहतूक कोंडी झाली. काहीवेळाने वाहतूक पोलीसांनी ही कोंडी फोडली.

गोदाघाट सुनसुना

करोनाचा धसका सर्वच पर्यटकांनी घेतला आहे. परराज्यातून येणार्‍या पर्यटकांची संख्या गोदाकाठी मंदावली असून गर्दीने बहरणारा गोदाघाट मात्र सुनसुना असल्याचे पाहायला मिळते आहे. गोदाघाटावरील मंदिरांमध्ये गर्दी कमी झाली असून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!