Type to search

Featured नाशिक

Video : ‘कॅफे इन’चे वीरपत्नींच्या हस्ते उद्घाटन

Share

नाशिक | प्रतिनिधी

‘नाशिकमधील पहिले कॉफी फोटोप्रिंट मशीन असलेले प्रायोनीर फूडस् फर्मचे ‘कॅफे इन’ कॉफी शॉपचे उद्घाटन पलाखरोड, द्वारका येथे आज सायंकाळी झाले.

यावेळी वीरपत्नी भारती शरद पगार, अनिता सिंग, 1989 मिसाईल रेजिमेंट कारगिल नायक दीपचंद आणि इंटरनॅशनल व्रेस्लिंग कोच कॅप्टन कमलसेन सिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

आज माझ्यासह वीरपत्नींचा जो सन्मान करण्यात आला तो खरोखरच भारावून टाकणारा आहे. याच छोट्या-छोट्या गोष्टी आम्हाला जगण्याची प्रेरणा देतात, असे मत नायक दीपचंद यांनी यावेळी व्यक्त केले.

 लहानपणापासून माझे स्वप्न होते की, आयुष्यात असे काही करू की ज्याच्यातून वीरपत्नींचा आणि ज्यांनी देशासाठी योगदान दिले आहे त्यांचा उचित सन्मान करता यावा. आज माझ्या कॉफी शॉपचे उद्घाटन यांच्या हातून झाल्याने मला खूप बरे वाटत आहे.

– हुझेफा ट्रंकवाला, संचालक, कॅफे इन कॉफी शॉप

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!