Type to search

Featured नाशिक

दिव्यांग गिर्यारोहक अंजना प्रधानने रचला जागतिक विक्रम; ११ वेळा कळसुबाई शिखर पादाक्रांत

Share

नाशिक :

दिव्यांग गिर्यारोहक अंजना प्रधानने रचला जागतिक विक्रम गरुडझेप प्रतिष्ठानची दिव्यांग गिर्यारोहक अंजना प्रधान हिने १५ मार्च २०२० रोजी ११ वेळा सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर अर्थात कळसुबाई शिखर पादाक्रांत केले व नवीन “जागतिक विक्रम“ नोंदविला. १ जानेवारी २०२० रोजी तिने विक्रम रचायला सुरवात केली व फक्त ७५ दिवसात १५ मार्च २०२० रोजी ११वी कळसुबाई शिखर मोहीम फत्ते केली.

तिच्या ह्या विक्रमाने अनेक युवा वर्गाला ह्यातून प्रेरणा मिळेल. प्रत्येक मोहिमेत अंजनाने एक सामाजिक संदेश हेल्मेट वापरा, गोदावरी प्रदूषण टाळा, झाडे लावा, वाहतूक नियम पाळा, बेटी बचाव-बेटी पढाव यासारखे सामाजिक जागृतीचे संदेश दिले व सामाजिक भान जपले. ११वी मोहीम हि गरुडझेप प्रतिष्ठान, सक्षम, रॉयल रायडर्स व सरस्वती ग्रुपचे कार्यकर्ते डॉ. संदीप भानोसे, हेमंत जुनागडे, सुदेश तांबट, अण्णा विसपुते, राजू रुपवते व नाभिक आरक्षण समितीचे शिवदास फुलवळकर अंजनाला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.

गरुडझेपने मोहिमेत वाहतूक सुरक्षेचे फलक घेऊन प्रबोधन हि केले. डॉ. भानोसे ह्यांनी देशभक्ती पूर्ण गीत गायले व प्रेरणादाई विचार मांडले. विविध संस्थांनी- शिवाजी गाडे (शिव उर्जा प्रतिष्ठान – पैठण), दिलीप गीते (गिरिदुर्ग भ्रमंती), सचिन पानमंद (शिव सह्याद्रीआणि ओम बजरंग), डॉ. संतोष वैद्य (सुख समृद्धी केअर सेंटर), दिवाकर मुजुुमदार (सक्षम संस्था), संजय पवार (नाशिक सायकलिस्ट), योगेश अहिरे, सुशीला नाईक, पोहरे फॅमिली (गरुडझेप), राजू रुपवते (रॉयल रायडर्स), विशाल आवटे ह्यांनी तिला ह्या उपक्रमात सहयोग दिला.

ह्या ११ मोहिमेत विविद दिव्यांगानी (चेतन रत्नपारखी, सायली पोहोरे, मयुरी चौधरी, रूद्र बलकवडे, रत्नाकर शेजवळ, छोटी चव्हाण, जागृती बांठिया, प्रभाकर कापडणीस) यांनीसुद्धा अंजना सोबत शिखर सर केले. मोहीम फत्ते झाल्यावर सर्व सहयोगी संस्थांनी तिचे अभिनंदन केले. रॉयल रायडर्सनि अंजनाला धैर्य पुरस्कार व डॉ. भानोसे ह्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविले. सदर मोहिमेत गरुडझेपचे योगेश अहिरे, जागतिक विक्रमवीर सागर बोडके, संदीप मुलाणे, मोहन कुलकर्णी, अजय आठले, गिरिदुर्गच्या सुरेखा कानवडे व सरला काळे, सरस्वती संस्थेचे कविता व संदीप फाटक, ममता व सुदेश तांबट.

हेमंत गुनागडे, अभय दिक्षित व लक्ष्मिकांत भार्गवे. सक्षमचे बापू जोशी, अण्णा विसपुते, प्रकाश देशपांडे, अरविंद देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, अशोक सोनावणे, मिलिंद खांडेकर, सदाशिव पाटील तसेच रॉयल रायडर्सचे राजू रुपवते, रागेंद्र जाधव, शं शिंदे, रवींद्र रुपवते, कुसुम रुपवते, जमीर सय्यद, संतोष गाडेकर, सागर शहाणे, आशिष कोमार, सागर शहाणे, ओम मंडलिक, डायमंड रुपवते, सुनंदा जाधव, नंदू देमासे, विजय जीगे, संतोष पौडवाल, अजय गावंडे, सचिन वाहने, शांताराम काळे तसेच अंजनाचे नातेवाईक, वडील रंगलाल प्रधान, आई शांताबाई, बहिण संजीवनी आवटे, भाऊ कैलास प्रधान, विकास प्रधान, राहुल कापसे, मारोती श्रीमंगले, शिवदास फुलवळकर उपस्थित होते. लवकरच जागतिक विक्रमाचे गौरवपत्र प्राप्त होईल असे डॉ. भानोसे ह्यांनी सांगितले .

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!