Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसटाणा : सागवाणाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

सटाणा : सागवाणाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

डांगसौंदाणे | प्रतिनिधी

बागलाणच्या पश्चिम भागातील सागाचे जंगल म्हणून ओळख असलेल्या डावखल जंगलात आज सटाणा वन विभागाने केलेल्या कारवाईत चौघा आरोपींना सागाची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याने त्यांच्यावर कार्यवाही करत अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ततानी वन हद्दीतील डावखल जंगल मध्ये सागाची तस्करी होत असल्याची गुप्त बातमी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर अधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्रतील जंगलात सापळा रचला असता यामध्ये संजय हिरामण देशमुख रा. गव्हाणेपाडा हा सागवान झाडाची तोड़ करताना आढळून आला चौकशीकामी ताब्यात घेतला असता अन्य तिघे साथीदारांची नावे पुढे आली.

त्यामध्ये कैलास आंताराम जोपळे रा. महारदर, नारायण गंगाराम साबळे, महारदर गिरीश महाराज चौरे, नकट्या हनुमंत जिल्हा डांग हे लाकूड कापण्याच्या करवती सह मोटरसायकल क्रमांक GJ 21 7258 व दोन मोबाईल संच या मुद्देमालासह मिळून आले वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एच. वाय. अहिरे ,एन.एम. मोरे, टी. आर. पाटील, के. यू. मोहिते, एम. के. बोडके, एजाज शेख, गंगाधर नवरे, कृष्ण काकुळते, आदिनी कार्यवाही करीत आरोपीना अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली सटाणा वन विभाग करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या