Type to search

Featured नाशिक

दिव्यांग रूद्राने केले कळसूबाई शिखर सर

Share

देवळाली कॅम्प :

भगूर येथील बांधकाम व्यावसायिक व भगूर नगरपरिषदेचे नगरसेवक दीपक बलकवडे यांचे पुतणे रूद्रा अर्चना अरुण बलकवडे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी अपंगत्वावर मात करून इगतपुरी तालुक्यातील 5400 फूट उंच कळसूबाई शिखर सर केले. महत्त्वाचे म्हणजे ज्या रूद्राला दोन पावले चलायला त्रास व्हायचा तोच रूद्रा आज ट्रेकिंग करतो. येथील खंडोबा टेकडीहून त्याने ट्रेकिंगची सुरुवात केली. रूद्राला लहानपणापासून या शिखराला गवसणी घालायचे स्वप्न होते.

कोणताही नकारात्मक विचार त्याच्या मनाला शिवला नाही. कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणार्‍या चार लोखंडी शिड्या रूद्राने मोठ्या जिद्दीने पार केल्या व गेल्या महिन्यात त्याने हे शिखर सर केले.

रूद्राला गंगापूररोड येथील सक्षम ग्रुपचे अध्यक्ष दिवाकर मुजुमदार, शिवाजी घोरपडे, रघुनाथ विसपुते, अनिल खांडेकर, श्रीकांत कुलकर्णी, अरविंद देशपांडे, वैभव ताजनपुरे, अमित घोरपडे, धीरज गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!