Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : पार्वते पते: नम:… हर हर महादेव; सोमेश्वरला हजारो भाविकांनी घेतले...

Video : पार्वते पते: नम:… हर हर महादेव; सोमेश्वरला हजारो भाविकांनी घेतले दर्शन

नाशिक । प्रतिनिधी

गंंगापूर गावातील प्राचीन सोमेश्वर शिवमंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी (दि.21) हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने निनादून गेले होेते. दर्शनासाठी भाविकांची अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. दिवसभर मंदिरात धार्मिक उपक्रमांची रेलचेल होती. भाविक शिवभक्तीत तल्लीन झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात चोख पोिलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने सकाळी पहाटे महाअभिषेक करण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची पावले सोमेश्वर मंदिरांकडे वळत होती. सकाळी 9 वाजता संस्थानच्या वतीने 1 हजार किलो शाबुदाना खिचडी, व लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी भक्तीधामचे महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती महाराज, चरणदास महाराज उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. दुपारनंंतर दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. गर्दीमुळे दुर्घटना घडू नये याची दक्षता घेत मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी रांगेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी हर हर महादेव, बम बम भोले या गजरात भाविक तल्लीन झाले होते. दर्शनासाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी पर्यंत दर्शनाच्या रांग लागली होती.

त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक दलाचे 15 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गंगापूर पोलीस ठाण्याचे 7 अधिकारी व 57 पोलीस शिपाई व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते.

मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप

मंदिर परिसरात फुल, खेळणी, उपवासाचे खाद्यपदार्थ, लहान मुलांसांंठी पाळणा, रसवंती, शोभेच्या वस्तुंचे छोटी मोठी दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी जणू यात्राच भरली होती. दर्शनाबरोबर भाविकांनी खरेदी व खाद्य पदार्थांवर ताव मारण्याचा आनंद लुटला.

- Advertisment -

ताज्या बातम्या