Type to search

Featured नाशिक

कुरिअर ऑफिस फोडुन घरफोडी करणारा जेरंबद; गुन्हेशाखा युनिट क्र. १ची कामगिरी

Share

नाशिक | प्रतिनिधी

आडगाव पोलीस स्टेशन ठाणे गुरनं. 64/2020 भा. द. वि. क 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात अज्ञात आरोपींनी गणेश मार्केट, कोर्णाक नगर आडगाव शिवारातुन इकॉम एक्सप्रेस प्रा. लि. कुरीयर कंपनीचे ऑफिसचे शटर तोडुन आत प्रवेश करुन एक गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी, रोख रुपये, डि.व्हीआर. असे एकुण 4,61,144 किमतीचा माल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हे शाखा युनिट क्र. 1 कडील नेमणुकीचे स.पो.नि. एम. एल. कुलकर्णी हे करीत असतांना त्यांना अज्ञात आरोपीतांनी गुन्हा करतांना इनोव्हा कारचा वापर केलेला असल्याची तसेच गुन्हा करणारा आरोपी हा एका पायाने लंगडत इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेलेला असल्याची माहिती मिळून आली. त्या अनुषंगाने  नाशिक शहर व जवळपासच्या परिसरातील टोल नाक्यावरुन गुन्हयाचा प्रकार घडल्या नंतर नाशिक शहराबाहेर गेलेल्या इनोव्हा कारचा शोध घेता इनोव्हा कार क्र. एमएच 01 पीए 8236 हे संशयित वाहन घोटी टोलनाका येथून नाशिक शहरा बाहेर गेल्याची माहिती मिळून आली.

सदर इनोव्हा कार बाबत अधिक माहिती घेता तिच्या चोरी बाबत सोलापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 119/2020, भादविक 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळून आली. तसेच गुन्हयातील आरोपीचे मिळालेल्या वर्णना प्रमाणे गुन्हा करणारा रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी बबन सर्जेराव जाधव हा काही दिवसांपुर्वीच कोल्हापूर कारागृहातुन जामीनावर सुटलेला असल्याची माहिती मिळून आली. मिळालेल्या माहितीचे आधारे तपास करता गुन्हा करणारा संशयीत आरोपी हा सातारा जिल्हयात असल्याची खात्रीशीर माहिती मिळून आल्याने स.पो.नि. एम. एल. कुलकर्णी व सोबत पो.ह.वा येवाजी महाले, पो.शि राहुल पालखेडे, विशाल देवरे, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, चालक, पो. शि समाधान पवार असे पोलीस पथक फलटण जिल्हा साताराकडे रवाना करण्यात आले. सतत दोन दिवस रात्रंदिवस आरोपींचा शोध घेवूनही आरोपींचा पत्ता लागत नव्हता.

त्याचे वास्तव्याच्या सर्व ठिकाणी शोध घेवूनही आरोपी मिळून आला नाही म्हणून निरा शहरातील हॉटेल, लॉजेस येथे तपास पथक शोध घेत असतांना त्यांना शहरातील निरा बसस्टॅण्ड समोरील त्रिमुर्ती लॉज येथे आरोपी लपलेला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे तपास पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून त्यास विचारपूस करत असताना त्याने त्याचे नाव बबन सर्जेराव जाधव वय 46, रा. चौधरवाडी, फलटण, ता. फलटण, जि. सातारा असे सांगीतले. त्याच्या कडे सदर गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली दिली.

त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता निरा येथून नाशिक येथे गुन्हेशाखा युनिट क्र. 1 कार्यालयात आणुन पुन्हा विश्वासात घेवून सखोल विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार सतीश बाळासाहेब चव्हाण रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे याच्या सोबत सोलापूर मधून चोरलेल्या इनोव्हा कारमध्ये येवून केलेला असल्याची कबुली दिली. त्यास गुन्हयात अटक करुन पो. क. रिमांड कालावधीत अटक आरोपी याचे निवेदन मेमोरंडम पंचनाम्या द्वारे गुन्हयात वापरलेली दहा लाख किमतीची इनोव्हा कार क्र. एम एच 01 पीए 8236 ही मंचर येथून तीन लाख पंच्याहत्तर हजार रु. किमतीची स्विफ्ट डिझायर कार क्र. एम एच 12 एच एफ 5602 बारामती येथून  (घरफोडी, चोरी केलेल्या पैशातुन खरेदी केलेली. एकुण 13 लाख 75 हजार किमतीचा माल अटक आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हयाचापुढील तपास पो.उ.नि. बलराम पालकर हे करीत असून यातील अटक आरोपी हा दि. 18 फेब्रुवारी रोजी कारागृहातुन सुटल्यानंतर त्याने लागलीच खालील नमुद प्रमाणे गुन्हे केलेले असुन त्याची कबुली दिलेली आहे. यवत पो.स्टे. पुणे ग्रामीण गुरनं. 183/2020 भादविक 457,380, हाडपसर पो.स्टे. पुणेषहर गुरनं. 284/2020 भादविक 457,380, विजापूरनाका पो.स्टे. सोलापूर शहर गुरनं. 119/2020 भादविक 457, 380, वाळुंज पो. स्टे. औरंगाबाद शहर गुरनं. 155/2020 भादविक 380,461 सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत व अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. शापुरी पो. स्टे. कोल्हापूर येथे गुरनं. 353/2019, भादविक 454, 457, 380, 34, शाहीपुरी पो. स्टे. कोल्हापूर गुरनं. 140/2019 भादविक 454,457, 380, 34, विश्राम बाग पोस्टे सांगली येथे गुरनं. 203/2019 भादविक 380,461,34, महाड एम.आय.डी.सी. पो. स्टे. रायगड येथे गुरनं. 29/2019, भादविक 454, 457, 380, 34, बारामती पो. स्टे. पुणे ग्रामीण येथे गुरनं. 411/2019 भादविक 457, 380, 34, बारामती पो. स्टे. पुणे ग्रामीण गुरनं. 509/2019,  भादविक 457,380,34, सासवड पो. स्टे. पुणे ग्रामीण येथे गुरनं. 185/2019 भादविक 454, 457, 380, 34, चाकण पो. स्टे. पुणे ग्रामीण येथे गुरनं. 791/2019 भादविक 454, 457, 380, 34, सिंहगडरोड पो. स्टे. पुणे शहर येथे गुरनं. 366/2019 भादविक 454, 457, 380, 34, चिपळून पो. स्टे. येथे गुरनं. 176/2019 भादविक 454, 457, 380, 34.

चिपळून पो. स्टे. येथे गुरनं. 177/2019 भादविक 454, 457, 380, 34, फलटण पो. स्टे. सातारा येथे गुरनं. 492/2018 भादविक 379, 34, कराड शहर पो. स्टे. सातारा येथे गुरनं. 447/2019 भादविक 454, 457, 380, 34, शिरवळ पो. स्टे. सातारा येथे गुरनं. 63/2019 भादविक 454, 457, 380, 34 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे. सदरची कामगीरी विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त, लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा, समीर शेख, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सपोनि. महेश कुलकर्णी, दिनेश खैरनार, सपोनि. हेमंत तोडकर, पोउनि. बलराम पालकर, सपोउनि. पोपट कारवाळ, पोहवा/ वसंत पांडव, संजय मुळक, रविंद्र बागुल, येवाजी महाले, प्रविण कोकाटे, पोना/आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, रावजी मगर, मनोज डेांगरे, विषाल काठे, फैय्याज सैय्यद, राजेष लोखंडे, मोहन देषमुख, षरद सोनवणे, संतोश कोरडे, शांताराम महाले, पो.शि. गणेश वडजे, विषाल देवरे, राहुल पालखेडे, निलेश भोईर, प्रविण चव्हाण, गौरव खांडरे, सचिन अजबे, मपोशिपो खरकर चालक, पोहवा. नाजीम पठाण, चापोशि समाधन पवार अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!