Type to search

Featured नाशिक

पुढील १५ दिवस जिल्ह्यातील सर्व जैन तीर्थक्षेत्रात दर्शन बंद

Share

उमराणे | वार्ताहर

कोरोना वायरस संक्रामक महामारीमुळे भारत सरकार व राज्य सरकार सूचनानुसार णमोकार तीर्थ येथे आयोजित प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य देवनंदी गुरुदेव यांचा ४०वा दीक्षा दिवस व २८ वाँ आचार्य पदारोहण दिवस भगवान महावीर स्वामी जी की जन्ममहोत्सव आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

णमोकार तीर्थ वर नित्यपूजा पंचामृत अभिषेक महाशांती धारा पूजन पुजारी ट्रस्ट कमिटी सदस्य करणार आहेत. ६ एप्रिल पर्यत निवासी धर्मशाळा ही बंद ठेवण्यात आली आहे. तरी भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन णमोकार तीर्थ ट्रस्ट अध्यक्ष नीलम अजमेरा बाल ब्रम्हचारिणी वैशाली दीदी यांनी केले आहे.

तसेच प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्री समेद शिखरजी, श्री कचनेरजी, श्री मांगीतुंगीजी, श्री गजपंथ, नाशिक, श्री अजनंगिरीजी, नाशिक, श्री चंद्रगिरीजी, चांदवड, 108 फूट वृषभदेव भगवान पहाड दर्शन मांगीतुंगीजी आदी सर्व ट्रस्ट कमिटी यांनी भाविकांना प्रवेश बंद केलेला असल्याचे कळविले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!