Type to search

Featured नाशिक

अवैध उत्खनन प्रकरणी साडेदहा लाखांचा दंड

Share

नाशिक । प्रतिनिधी

गौण खनिज भरारी पथकाने दिंडोरी येथे अवैधरीत्या मुरुम चोरी करणार्‍या व्यक्तिला रंगेहाथ पकडले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पथकाने जेसीबी, मुरुम वाहून नेणारे वाहन जप्त केले असून त्यास साडेदहा लाखांचा दंड ठोठावला आहे. गौण खनिज अधिकारी आनंद पाटील यांनी ही कारवाई केली. या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या गौण खनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील महसूल वसूलीकडे तहसीलदारांनी आता आपला मोर्चा वळविला असून यातील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या गौण खनिजातून अपेक्षित भरणा होत नसल्याने आता नियमित व्यावसायिकांकडून अप्राप्त रॉयल्टी भरण्याचे आदेश दिले आहेत. तर अवैध उत्खनन करणार्‍यांवर वॉच ठेवत त्यांच्याकडून दंडात्मक वसूली केली जात आहे.

तालुक्यातील 16 स्टोन क्रशर धारकांना त्यासाठी आता नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. दिंडोरी येथे अवैधरीत्या गौणखनिज चोरी होत असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली होती. त्यानूसार भरारी पथकाने छापा टाकत कारवाई केली.

या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने डोंगर पोखरुन मुरुम चोरी केली जात होती. भरारी पथकाने जेसीबी व ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी साडेदहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्या व्यवसाय करणर्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!