Friday, April 26, 2024
Homeनाशिकउपनगर येथे पित्यास मारहाण करत मुलीचा विनयभंग

उपनगर येथे पित्यास मारहाण करत मुलीचा विनयभंग

नाशिक : बळजबरीने घरात घुसून संशयिताने पित्यासमोर पीडित मुलीचा विनयभंग केल्याची घटना उपनगर परिसरातील ओमनगरमध्ये घडली.

उमेश मधुकर मते (३०, रा. चंद्रलक्ष्मी सोसायटी, राहुलनगर, पवारवाडी, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

पीडितेच्या पित्याच्या फिर्यादीनुसार, संशयित उमेश मते हा दारुच्या नशेत आणि हातात कोयता घेऊन बुधवारी (ता.3) रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरास घुसला. पीडित मुलीचे वडील घरात असताना, मला तुमच्या मुलीशी बोलायचे आहे असे म्हणून बळजबरीने तिचा हात पकडून ओढू लागला. त्यावेळी पीडित मुलीने नकार दिला तर तिच्या पित्याने तुझा काय संबंध असा जाब विचारला. त्यावेळी संशयिताने त्यांच्या पीडित मुलीचा विनयभंग करीत तिच्या वडीलांना मारहाण केली.

याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयिताविरोधात मारहाण, विनयभंग आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक व्ही. लोंढे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या