Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनसे नगरसेवकांची सीएम फंडला ९० हजारांची मदत

मनसे नगरसेवकांची सीएम फंडला ९० हजारांची मदत

नाशिक : करोना संकटाचा विळखा देशभरात दिवसेंदिवस घट्ट होत असुन त्याविरुध्द लढण्यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. हे लक्षात घेउन महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ९० हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आला.

करोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. देशात रुग्णांचि संख्या ४० हजारांचा पुढे गेली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात देखील रुग्णांचा आकडा २७ हजारांच्या पुढे गेला आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. जो तो आपल्यापरीने मुख्यमंत्री सहायता निधिला आर्थिक मदत करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मदत कार्यात मागे नाही. मनसेच्या महापालिकेतील सहा नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन एकूण ९० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत.

प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्ञानेश्वर बोडके यांनी मदतीचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांना दिला. यापुर्वी देखील पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, मास्क देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या