Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आमदारांनी फोन करताच हजर झाली बस; विदयार्थ्यांनी मानले आभार

Share
आमदारांनी फोन करताच हजर झाली बस; विदयार्थ्यांनी मानले आभार Latest News Nashik MLA Saroj Ahire Telephoned the Student Bus At Mahiravni

नाशिक : पेपरला जाण्यासाठी ताटकळत उभे असलेल्या विद्यार्थ्यांना आमदार सरोज अहिरे यांनी बस सोय करून दिली. आमदार सरोज अहिरे यांनी विद्यार्थ्यांप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे जिल्ह्याभरात कौतुक होत आहे.

दरम्यान सोमवार (दि. ०३) रोजी आमदार सरोज अहिरे पिंपळगाव गरुडेश्वर येथे जात असतांना रस्त्यातच एका स्टोपवर काही मुली उभे असलेल्या दिसून आल्या. यावेळी त्यांनी गाडी थांबवून विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी सांगितले कि, आज पेपर असून अद्यापही बस न आल्याने पेपरची वेळ टळत आहे. त्यामुळे पेपरही बुडू शकतो, अशा केविलवाण्या शब्दात त्यांनी आली व्यथा मंडळी.

आमदार सरोज अहिरे यांनी लागलीच डेपोत फोन करीत बस उपलब्ध करून देण्यास सांगितले. अन पुढील काही मिनटात बस आली. यानंतर मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला होता. तसेच या मार्गावर अतिरिक्त बसेसची सोया करावी अशीही मागणी करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!