Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आमदार हिरामण खोसकर यांच्या चुलत चुलत्याची हत्या; कारण अस्पष्ट

Share
आमदार हिरामण खोसकर यांच्या चुलत चुलत्याची हत्या; कारण अस्पष्ट; Latest News NAshik MLA Khoskar Relatives Murder At satpur Area

नाशिक : इगतपुरीचे आमदार हिरामण खाेसकर यांच्या वयाेवृद्ध चुलत चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री सातपूर भागात उघडकिस आली. हत्येचे कारण कळले नसून पाेलीसांनी मारेकऱ्यांचा शाेध सुरू केला आहे.

या घटनेत संशयितांनी प्रभाकर खाेसकर (65, रा. निमगाव) यांच्या डाेक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. त्यानंतर मृतदेह सातपूर परिसरातील वासाळी राेडजवळ असलेल्या फाशीचा डाेंगर येथे आणून टाकल्याचा संशय पाेलीसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक राकेश हांडे यांच्यासह पाेलीस आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाेलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. मृत प्रभाकर खाेसकर हे व्यसनाच्या आहारी गेले हाेते, असे बाेलले जात असून त्यांची हत्या नेमकी काेणी व का केली, याचा तपास लागलेला नाही. याबाबत सातपूर पाेलीस ठा्ण्यात नाेंद करण्यात आली असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे करत आहे. मृतदेह शासकिय रूग्णालयात आणल्यावर येथे माेठी गर्दी जमा झाली हाेती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!