नाशिक – पेठ मार्गावर दुधाच्या वाहनांमधून प्रवाशी वाहतुक           

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो

पेठ : दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवाशी वाहतूक सुरु असल्याचा प्रकार नाशिक – पेठ मार्गावर घडत असल्याचे समोर येत आहे.

सध्या देशात लॉक डाऊनची स्थिती असून अत्यावश्यक सेवा इतर सर्व बंद आहे. अशातच मुंबई, इतर शहरांमधून गावाकडे जाणाऱ्यांची वाढते आहे. त्यासाठी बंद गाड्यामधून प्रवास केला जात आहे. दुध पुरवठा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कुठल्याही आडकाठी विना दुध वितरणाचे काम चालू या वाहनांमधून प्रवास केला जात आहे.

इतर वाहनांची सुविधा नसल्याने चालक सांगतील तितकी रक्कम प्राप्त होत असल्याने त्यास धरबंध राहीलेला नाही. विशेष बाब म्हणजे दुध वाहतुकीस वेळेचे बंधन नसल्याने महाराष्ट्र – गुजरात सिमारेषा ओलांडने शक्य होते.

दुध कॅरेटच्या आडून प्रवाशी वाहतुक होत असल्याने कोरोना संक्रमनाचा धोका वाढण्याची शक्यताही वाढली असल्याने नाशिक – पेठ – गुजरात मार्गावरील दुध वाहतुक वाहनांची काटेकोरपणे तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com