Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा रूग्णालयात प्लास्टिक कचरा विघटनासाठी मायक्रोव्हेव मशीन

Share
जिल्हा रूग्णालयात प्लास्टिक कचरा विघटनासाठी मायक्रोव्हेव मशीन Latest News Nashik Microwave Machine at Civil Hospital for Plastic Waste Disposal

नाशिक । प्लास्टिक कचर्‍याचे विघटन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात मायक्रोव्हेवचे उद्घाटन करण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच या मशिनचा वापर करण्यात येत असून पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचीव रविंद्रन यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. जीईएफ-युनिडो एमओईएफसीसी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळा मार्फत सुमारे 80 लाख रुपये खर्च करुन मायक्रोव्हेव मशीन बसवण्यात आले आहे. या मशिनमार्फत रुग्णालयातील प्लास्टिक कचर्‍याचे कमी वेळेत विघटन करता येणे शक्य आहे. महाराष्ट्रातील एक माँडेल प्रोजेक्ट म्हणुन या प्रकल्पाकडे बघितले जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. निखिल सैंदाणे यांनी कामकाज पाहिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला. उद्घाटन प्रसंगी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रिंसिपल सायन्टफिक आँफिसर डाँ. अमर सुपाते, जे. बी. सांगेवार इतर पदाधिकारी, जिल्हा रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डाँ. अनंत पवार यांच्यासह इतर डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!