Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आडगाव येथील मेडिकल कॉलेजच्या वतीने शहर पोलिसांची वैद्यकीय तपासणी

Share

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील  डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या विशेष वैद्यकीय  पथकामार्फत  नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या  विविध पोलिस ठाण्यांमधील पोलिसांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अशी माहीती महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ मृणाल पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पाश्वॅभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान  पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील  विविध ठिकाणच्या नाकाबंदीत नाशिक पोलिस सेवा देत आहे. पोलिसांच्या आरोग्याची काळजी आणि सामाजिक योगदान म्हणून डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून वैद्यकीय तपासणी सेवा दिली जात आहे.

मराठाविद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, संचालक डॉ- प्रशांत देवरे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, पोलीस वेल्फेयर समितीचे संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनव सहकार्याने ही वैद्यकीय  तपासणी सुरु आहे.

अधिष्ठाता डाॅ. मृणाल पाटील व शिक्षणाधिकारी डाॅ.नानासाहेब पाटील, डॉ- प्रदीप बर्डे , डॉ- सुहास पाटील  यांनी पोलिसांच्या वैद्यकीय तपासणी करीता महाविद्यालयातील डाॅक्टरांचे विशेष पथक तयार केले असून हे पथक शहराच्या विविध भागात असलेल्या नाकाबंदी व पोलीस चौक्यांवर जाऊन पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची संपुर्ण वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!