Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मखमलाबाद : विषारी औषध सेवन करून विवाहितेची आत्महत्या, पतीवर गुन्हा

Share
मखमलाबाद : विषारी औषध सेवन करून विवाहितेची आत्महत्या, पतीवर गुन्हा Latest News Nashik Married Women Suicide by Consuming Poisonous At Tambe Mala

नाशिक। राहत्या घरी विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना म्हसरूळ परिसरात 17 जानेवारीला घडली. तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह दोघांवर इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुनीता आकाश गायकवाड (रा.तांबेमळा, हरिओमनर, मखमलाबादरोड) असे आत्महत्या करणार्‍या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या मद्याचे व्यसन आणि शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात सिंधुबाई प्रतापसिंग चौधरी यांच्या फिर्यादीनुसार सुनीताचा पती आकाश दत्तात्रय गायकवाड याच्याविरोधात सुनीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर कोणाच्या नावावर ठेवायचे यासाठी पतीकडून होणार्‍या छळाला आणि त्याच्या मद्याच्या व्यसनाला कंटाळून सुनीताने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!